रत्नागिरी : विलवडे स्थानकावरील विविध गाड्यांच्या थांब्यांसाठी २० सप्टेंबरला उपोषण
रत्नागिरी, 20 ऑगस्ट (हिं.स.) । कोकण रेल्वेवरील विलवडे रेल्वेस्थानकावर विविध गाड्यांना थांबा सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेने येत्या २० सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. संघटनेची बैठक विलवडे येथे झाली. लांजा तालुका पूर्व भाग व राजापू
विलवडे स्थानकप्रमुखांना प्रवासी संघटनेचे निवेदन


रत्नागिरी, 20 ऑगस्ट (हिं.स.) । कोकण रेल्वेवरील विलवडे रेल्वेस्थानकावर विविध गाड्यांना थांबा सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेने येत्या २० सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.

संघटनेची बैठक विलवडे येथे झाली. लांजा तालुका पूर्व भाग व राजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या सभेला आवर्जून हजेरी लावली. मागणी केलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती, सुसज्ज वेटिंग रूम, पथदीप, स्टेशनवर येणारा रस्ता, अपंग व ज्येष्ठ नागरिकांचा रस्ता, त्यावरील काळोख, खेड ते सावंतवाडी लोकल, प्रवासी शेड, स्वच्छता या व इतर मागण्यांसाठी प्राथमिक स्वरूपात निवेदन देऊनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष आणि काही वेळा खोटी माहिती देण्यात आली. त्याच्या निषेधार्थ रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी २० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणासाठी बहुसंख्य प्रवाशांनी व नागरिकांनी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपोषणाची जबाबदारी विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या मुंबई आणि ग्रामीण शाखेने घेतली आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबरला बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या मुख्यालयासमोर उपोषण होणार आहे. त्यानंतही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २३ नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलनाचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यावेळी मुंबई संघटनेचे सल्लागार सुभाष लाड यांनी खास मार्गदर्शन केले. यावेळी स्थानक प्रमुख सुबोध भाटकर यांना संघटना कार्यकारिणीतर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेची नवीन कार्यकारिणी व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. कार्यकारिणी अशी - अमोल मारुती रेडीज (अध्यक्ष), सुरेश सीताराम शिगम, भास्कर श्रीपत खामकर, संतोष श्रीधर चव्हाण (उपाध्यक्ष), दीपक तुकाराम तोरस्कर, (सरचिटणीस), राजेश विठोबा बेर्डे (सहचिटणीस), अन्वर रखांगी (खजिनदार), सदस्य - प्रकाश तानू राजपकर, युवराज मारुती हांदे, संजय आयरे, विजय मुरलीधर कदम, विवेक विजय काटकर, काशिराम राजाराम राजापकर, शशिकांत महादेव खामकर, अमर गणपत खामकर, अजय आत्माराम चव्हाण, दीपक दत्ताराम कानसे, संतोष कदम, अमोल दीपक कदम, मंगेश दत्ताराम जाधव, प्रतीक प्रकाश मांडवकर, उमेश वामन खामकर, सल्लागार - जगदीश राजापकर दिलीपभाऊ पळसुलेदेसाई, .आत्माराम चव्हाण, रवींद्र खामकर, डॉ. एस. व्ही. कदम, सत्यवान विष्णू खामकर, किशोर नारकर.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande