उरुळी देवाची येथे ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी निर्मिती
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)। उरुळी देवाची येथील कचरा डेपो परिसरात दररोज ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेने तयार केला असून, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिट
PCMC


पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

उरुळी देवाची येथील कचरा डेपो परिसरात दररोज ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेने तयार केला असून, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या प्रकल्पाची उभारणी करणार आहे.

या प्रकल्पासाठी महापालिकेकडून १२ एकर जागा २७ वर्षांसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिएकर प्रतिवर्ष केवळ एक रुपया भाडे आकारले जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तयार केलेला हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

प्रकल्पाची उभारणी तसेच पुढील २५ वर्षांच्या संचालन आणि देखभालीचा संपूर्ण खर्च बीपीसीएलकडून केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी महापालिकेवर थेट आर्थिक भार पडणार नसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेकडून प्रकल्पासाठी आवश्यक जागेसह रस्ता, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, वर्गीकरण केलेला ओला कचरा प्रकल्पस्थळी पोहोचविण्याची जबाबदारीही महापालिकेची राहणार आहे.

दररोज ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याने कचरा व्यवस्थापनाला चालना मिळण्याबरोबरच त्यापासून बायो-सीएनजीची निर्मिती होणार आहे. प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande