छ. संभाजीनगर - वैजापुर येथे एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती तालुकास्तरीय बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। वैजापुर पंचायत समिती येथे आमदार रमेश पा. बोरनारे सर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश भाऊ गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ''एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती''ची तालुकास्तरीय बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत त
Q


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। वैजापुर पंचायत समिती येथे आमदार रमेश पा. बोरनारे सर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश भाऊ गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली 'एकात्मिक आरोग्य वर्धिनी समिती'ची तालुकास्तरीय बैठक पार पडली.

या महत्त्वपूर्ण बैठकीत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला असून, नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी पंचायत समिती सभापती व उपसभापती महोदय

जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य तालुका आरोग्य अधिकारी आणि सर्व संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande