एकनाथ शिंदेच्या परभणी दौऱ्याच्या नियोजनासाठी शिवसेनेची आढावा बैठक
परभणी, २१ ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावली विश्रामगृह येथे शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. परभणी जिल्ह्याचे खासदार संजय (बं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याच्या नियोजनासाठी आढावा बैठक दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक सज्ज


परभणी, २१ ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावली विश्रामगृह येथे शिवसेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. परभणी जिल्ह्याचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दौऱ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा, यासाठी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपापली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दौरा भव्य, शिस्तबद्ध आणि यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करून त्यानुसार नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी तसेच त्यांच्या दौऱ्याला अभूतपूर्व यश मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande