अक्कलकोटमध्ये १ हजार घरांच्या गृहप्रकल्पाला केंद्राची मंजुरी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकारण्याचा मार्ग मोकळा सोलापूर, २१ ऑगस्ट (हिं.स.) : अक्कलकोट शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अल्प किमतीत पक्के आणि हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. आमदार सचिन कल्या
sachin Klaynseti


आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकारण्याचा मार्ग मोकळा

सोलापूर, २१ ऑगस्ट (हिं.स.) : अक्कलकोट शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अल्प किमतीत पक्के आणि हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरांच्या गृहप्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या गृहप्रकल्पात केवळ घरांची उभारणी न करता लाभार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. प्रकल्प परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि वीजपुरवठा यांसारख्या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाभार्थी कुटुंबांना पक्क्या घरासोबत सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात राहण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

घरासोबत आर्थिक सक्षमीकरणावर भर

या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणावरही भर देण्यात येणार आहे. कौशल्य विकास, रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याने घरासोबत कुटुंबांच्या उत्पन्नवाढीला आणि आर्थिक स्थैर्यालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

अक्कलकोट शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणारा हा प्रकल्प ठरेल, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीमुळे या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande