ॲड. असीम सरोदे यांचे रविवारी रत्नागिरीत व्याख्यान
रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । संविधानावर आधारित लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि नागरिकांचे हक्क या विषयावर जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी शहरात न्यायवेध सभा या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर
ॲड. असीम सरोदे यांचे रविवारी रत्नागिरीत व्याख्यान


रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । संविधानावर आधारित लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि नागरिकांचे हक्क या विषयावर जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी शहरात न्यायवेध सभा या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील, संविधान विश्लेषक व नागरीहक्क भाष्यकार ॲड. असीम सरोदे उपस्थित राहणार आहेत. ते संविधान, न्याय आणि लोकशाहीसाठी संवाद या विषयावर विचार मांडणार आहेत. लॉ लॅब इनोव्हेशन्स आणि जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही सभा रविवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जे. के. फाइल परिसरातील रॉयल बँक्वेट हॉल येथे होणार आहे.

संविधानाचा सन्मान, सर्व जाती-धर्मांतील नागरिकांचे अधिकार आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये यांविषयी समाजात सजगता निर्माण व्हावी, या हेतूने या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. या सभेचे निमंत्रक तथा जनहित फाउंडेशनचे संस्थापक प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी जिल्ह्यातील सर्व अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सजग नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande