बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा जामीन नामंजूर
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। बीड येथील विशेष प्रकरण क्रमांक 181/2026 मध्ये माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जामीन मिळण्याच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसला आहे. नियमित जामीन अर्ज यापूर्वीच गुणवत्तेच्या आधारावर नामंजूर झाल्यानंतर, आता त्यांनी दाखल केल
अविनाश पाठक


बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। बीड येथील विशेष प्रकरण क्रमांक 181/2026 मध्ये माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जामीन मिळण्याच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसला आहे. नियमित जामीन अर्ज यापूर्वीच गुणवत्तेच्या आधारावर नामंजूर झाल्यानंतर, आता त्यांनी दाखल केलेला डिफॉल्ट/स्टॅट्युटरी जामीन अर्जही अतिरिक्त सत्र न्यायालय, बीड यांनी 20 ऑगस्ट 2026 रोजी स्पष्टपणे नामंजूर केला आहे.

बीडचे जिल्हाधिकारी असताना अविनाश पाठक यांनी राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात ६८ कोटींचा मोबदला ३१० कोटींपर्यंत वाढवून दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) ५ मे २०२६ रोजी लातूरमधून त्यांना अटक केली. या घोटाळ्यानंतर राज्य सरकारने त्यांना निलंबित केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande