बीड - महादेव मुंडे हत्येप्रकरणी बॅनरमधून भावनिक सवाल
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। बीडमध्ये बॅनरमधून सवाल; “गड्या हो, मी पण तुमचाच समाज बांधव ना? माझ्यासाठी कधी रस्त्यावर उतरणार?” असा भावनिक प्रश्न बॅनरवरून उपस्थित करण्यात आला आहे. बीड शहरात आज लागलेल्या एका बॅनरने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा निर्म
Q


बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

बीडमध्ये बॅनरमधून सवाल; “गड्या हो, मी पण तुमचाच समाज बांधव ना? माझ्यासाठी कधी रस्त्यावर उतरणार?” असा भावनिक प्रश्न बॅनरवरून उपस्थित करण्यात आला आहे.

बीड शहरात आज लागलेल्या एका बॅनरने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण केली आहे. स्व. महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी अद्याप न्याय मिळालेला नसल्याची भावना व्यक्त करत, आज विलास घुलेच्या मारेकऱ्यांना अटक करावी यासाठी मोर्चा काढण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या बॅनरमधून थेट सवाल करण्यात आला आहे माझ्यासाठी कधी रस्त्यावर उतरणार?

स्व. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही, असा आरोप कुटुंबीय आणि समर्थकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यांच्या न्यायासाठी मोठा मोर्चा काढण्यात आला नाही; मात्र विलास घुलेचे मारेकरी पकडले गेले आहेत तरी जो आरोपीचं नाही त्याला पकडण्याची मागणी करण्यासाठी आज मोर्चा निघाल्याने महादेव मुंढेसाठी असा मोर्चा कधी निघणार याबाबत नाराजी व्यक्त होत असल्याचे या बॅनरमधून दिसून येते.

या बॅनरच्या माध्यमातून समाजातील न्यायाच्या लढ्यांबाबत दुहेरी निकष तर लावले जात नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. “एका समाजबांधवासाठी रस्त्यावर उतरता, मग महादेव मुंडे यांच्या न्यायासाठी कधी उतराल?” हा संदेशच बॅनरच्या केंद्रस्थानी असल्याची चर्चा बीडमध्ये रंगली आहे. या बॅनरमुळे स्व. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande