नेरळ भागातून जोत्स्नाताई विरले यांच्या पुढाकाराने भीमाशंकर यात्रा रवाना
रायगड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। श्रावण महिन्याचे औचित्य साधून नेरळ, कोल्हारे व धामोते परिसरातील सुमारे ७५० भाविकांसाठी भीमाशंकर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले. जोत्स्नाताई महेश विरले यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी ७.३० वाजता १४ विशेष बस
Bhimashankar pilgrimage flagged off under the initiative of Jyotsnatai Mahesh Virle.


Bhimashankar pilgrimage flagged off under the initiative of Jyotsnatai Mahesh Virle.


रायगड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। श्रावण महिन्याचे औचित्य साधून नेरळ, कोल्हारे व धामोते परिसरातील सुमारे ७५० भाविकांसाठी भीमाशंकर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले. जोत्स्नाताई महेश विरले यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी ७.३० वाजता १४ विशेष बसमधून सुमारे ७०० महिला भाविक, तर अन्य ५० भाविक चारचाकी वाहनांतून भीमाशंकरच्या दिशेने रवाना झाले. यात्रेला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळी ६ वाजल्यापासून भाविक नियोजित ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती. सकाळी ७.३० वाजता विशेष बस भक्तिमय वातावरणात भीमाशंकरकडे रवाना झाल्या. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

भाविकांच्या सोयीसाठी यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आले. प्रवासादरम्यान सुरक्षिततेला प्राधान्य देत एक रुग्णवाहिका आणि दोन डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक भाविकाला ओळखपत्र देण्यात आले. जोत्स्नाताई विरले यांच्यासह महेश विरले हेदेखील भाविकांसोबत यात्रेत सहभागी झाले आहेत.

या यात्रेच्या आयोजनात सोमनाथ विरले, पपेश विरले, भरत पेरणे, रोशन म्हसकर, कृष्णा घाटे यांनी मोलाचे योगदान दिले.

जोत्स्नाताई महेश विरले या महिलांसाठी तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या पुढाकारातून आयोजित या धार्मिक यात्रेमुळे ऐन श्रावणात शेकडो भाविकांना भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. सामूहिक प्रवास, भक्तिमय वातावरण आणि दर्शनाचा उत्साह यामुळे यात्रेत सहभागी भाविकांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले.

धार्मिक उपक्रमासोबतच भाविकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतल्याने यात्रेच्या नियोजनाचे परिसरातून कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande