माजलगावात बर्निंग कारचा थरार; आठ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। बीडच्या माजलगाव शहरावळ केसापुरी कॅम्प परिसरात चालत्या स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. गाडीमध्ये तब्बल आठ प्रवासी होते. स्कॉर्पिओने अचानक पेट घेतल्यानंतर काही क्षणांतच आगीच्या
बर्निंग थरार


बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

बीडच्या माजलगाव शहरावळ केसापुरी कॅम्प परिसरात चालत्या स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. गाडीमध्ये तब्बल आठ प्रवासी होते. स्कॉर्पिओने अचानक पेट घेतल्यानंतर काही क्षणांतच आगीच्या मोठ्या ज्वाला भडकल्या आणि संपूर्ण वाहन धुराच्या लोटात वेढले गेले. त्यामुळे गाडीतील प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande