छ. संभाजीनगर - आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या एका डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण कु
छ. संभाजीनगर - आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या एका डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण कुटुंब डोळ्यांदेखत मृत्यूच्या खाईत लोटले गेल्याने तिसगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुणाल मुरलीधर चांदवडे (वय 18),मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हा सगळा प्रकार सुरु झाला होता. कुणाल चांदवडे हा नैराश्याच्या भरात खवड्या डोंगरावर जीव द्यायला गेला होता. त्याच्यापाठोपाठ त्याचे आई-वडील, तिसगावचे ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. कुणालचे आई-वडील आणि तिसगावचे ग्रामस्थ त्याची मनधरणी करत होते. कुणालने अखेर डोंगरावरुन खाली उडी टाकली आणि त्याला वाचवताना तोल जाऊन वडीलही खाली पडले. त्यापाठोपाठ आईनेही डोंगरावरुन खाली उडी टाकली. उंचावरुन खाली पडल्यामुळे या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande