नाशिक साधुग्राममधील वादग्रस्त 'माइस हब' प्रकल्प अखेर रद्द
नाशिक, 21 ऑगस्ट (हिं.स.)। तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेवर प्रस्तावित असलेला व्यावसायिक ''माईस हब'' शासनाने अखेर रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे येथील पश्चिम विभागीय खंडपीठासमोर (पुणे) झालेल्या सुनावणीदरम्या
नाशिक साधुग्राममधील वादग्रस्त 'माइस हब' प्रकल्प अखेर रद्द


नाशिक, 21 ऑगस्ट (हिं.स.)। तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेवर प्रस्तावित असलेला व्यावसायिक 'माईस हब' शासनाने अखेर रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे येथील पश्चिम विभागीय खंडपीठासमोर (पुणे) झालेल्या सुनावणीदरम्यान महानगरपालिकेच्या यासंदर्भात माहिती दिली.

या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. साधुग्रामच्या नियोजित जागेत सुमारे अठराशे झाडे तोडून त्याठिकाणी माईस हब साकारण्याचा प्रस्ताव होता. आधी साधुग्रमासाठी जर्मन हँगर आणि त्यानंतर भारत मंडपच्या धर्तीवर प्रदर्शनी केंद्र साकारण्याचा प्रस्ताव होता. त्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने यासंदर्भात काढलेल्या निविदा रद्द केल्या होत्या. दरम्यान, वृक्षतोडीच्या विरोधात हरित 66 लवादात दाखल याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. अनिकेत प्रवीण निकाले यांनी राष्ट्रीय हरित लवादात मुळ याचिका दाखल केली होती. साधुग्रामच्या जागेवर व्यावसायिक उद्देशाने 'माईस हब' उभारताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून पर्यावरणाचा होणारा हास थांबवावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

नाशिक सुनावणीदरम्यान महापालिकेच्या वतीने उपस्थित वकील श्रीरंग वर्मा यांनी न्यायाधीशांसमोर स्पष्ट केले की, राज्य शासनाने 'माईस हब' प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हरित लवादाचे निर्देश या वक्तव्याची दखल घेत न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने महापालिकेला या निर्णयाबाबत लिखित उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी महापालिकेला आठवड्यांची मुदत देण्यात आली असून, पुढील सुनावणी ९ सप्टेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande