धाराशिवच्या २० गुणवंत विद्यार्थ्यांची नासाकडे झेप! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला संधी
धाराशिव, 21 ऑगस्ट (हिं.स.)। धाराशिवच्या २० ‘चांदण्यांची’ नासाकडे झेप! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आता आकाशाचीही मर्यादा उरलेली नाही, या शब्दात धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी कौतुक केले आहे. धाराशिव जिल्हा पर
अ


धाराशिव, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

धाराशिवच्या २० ‘चांदण्यांची’ नासाकडे झेप! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आता आकाशाचीही मर्यादा उरलेली नाही, या शब्दात धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी कौतुक केले आहे.

धाराशिव जिल्हा परिषद शाळांमधील २० गुणवंत विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नासा भेटीसाठी अंतिम निवड झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर हे अभिमानास्पद यश संपादन केले. जिल्हा परिषद येथे संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्यात सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

आपल्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून, तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून ग्रामीण विद्यार्थ्यांना नासासारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची ही अनोखी संधी मिळत आहे.

नासा भेटीदरम्यान या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, रॉकेट तंत्रज्ञान, उपग्रह, वैज्ञानिक प्रयोग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. ही भेट केवळ एक शैक्षणिक सहल नसून, त्यांच्या स्वप्नांना नवे आकाश देणारी आणि भविष्यात विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेण्याची प्रेरणा देणारी ठरणार आहे.

या २० विद्यार्थ्यांच्या यशातून जिल्हा परिषद शाळांमध्येही जागतिक दर्जाची गुणवत्ता घडत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या यशामागे मेहनती विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अथक प्रयत्न आहेत.

धाराशिवच्या मातीतून निघालेली ही २० ‘चांदणी’ आता नासाच्या आकाशात झेपावणार आहेत! स्वप्न मोठे असेल, जिद्द प्रबळ असेल आणि मेहनतीला दिशा असेल, तर गावातील शाळेत शिकणारा विद्यार्थीही जगाच्या पटलावर आपली ओळख निर्माण करू शकतो!

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande