संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरात भव्य मिरवणूक
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : संत शिरोमणी नरहरी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला. दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. श्री नरहरी चौक, खडकेश्वर येथून मि
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : संत शिरोमणी नरहरी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला. दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

श्री नरहरी चौक, खडकेश्वर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, चिमुकले तसेच सर्व स्तरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरण आणि उत्स्फूर्त सहभागामुळे मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली. मिरवणूक संस्थान गणपती मंदिरापर्यंत उत्साहात पार पडली.

यावेळी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या भक्ती, समर्पण आणि सेवाभावी विचारांचे स्मरण करण्यात आले. मंत्री अतुल सावे यांनी संत नरहरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

“संत नरहरी महाराजांच्या विचारांमधून भक्ती, सेवा आणि समर्पणाची प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्याचे स्मरण करून समाजात एकोपा आणि सद्भावना वाढीस लागावी, हीच प्रार्थना,” असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande