एचडीएफसी बँकेने विदेशी बॉन्डमधून उभारले 1.75 अब्ज डॉलर
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट (हिं.स.)। देशातील आणि खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेने व्यवसाय वाढवण्यासाठी विदेशी बॉन्ड जारी करून 1.75 अब्ज अमेरिकन डॉलर उभारले आहेत. एचडीएफसी बँकेने शुक्रवारी शेअर बाजाराला रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या मा
HDFC Bank Raises $1.75 Billion via Foreign Bonds


नवी दिल्ली, 21 ऑगस्ट (हिं.स.)। देशातील आणि खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेने व्यवसाय वाढवण्यासाठी विदेशी बॉन्ड जारी करून 1.75 अब्ज अमेरिकन डॉलर उभारले आहेत.

एचडीएफसी बँकेने शुक्रवारी शेअर बाजाराला रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गिफ्ट सिटी शाखेच्या माध्यमातून 1.75 अब्ज अमेरिकन डॉलरचे ‘सीनियर अनसिक्योर्ड बॉन्ड’ जारी केले आहेत. बँकेने सांगितले की, तीन वर्षांत मॅच्युअर होणारे 50 कोटी अमेरिकन डॉलरचे बॉन्ड 5.159 टक्के कूपन रेटवर जारी करण्यात आले आहेत. तर उर्वरित 1.25 अब्ज यूएस डॉलरचे पाच वर्षांत मॅच्युअर होणारे बॉन्ड 5.4 टक्के कूपन रेटवर जारी करण्यात आले आहेत.

एचडीएफसी बँकेने सांगितले की, हे बॉन्ड इंडिया आयएनएक्स (इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (आयएफएससी) लिमिटेड) आणि एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज (एनएसई-आयएक्स) येथे लिस्ट केले जातील.विदेशी बॉन्ड हे कर्ज उभारण्याचे एक साधन आहे. एखादी कंपनी दुसऱ्या देशाच्या मार्केटमधून पैसा उभारण्यासाठी असे बॉन्ड जारी करते. हे बॉन्ड संबंधित देशाच्या लोकल करन्सीमध्ये किंवा इंटरनॅशनल करन्सीमध्ये जारी केले जाऊ शकतात. भारतीय इन्व्हेस्टर्स उदारीकृत प्रेषण योजना (एलआरएस) अंतर्गत ग्लोबल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande