
मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। प्रत्येक तीन-चाकी आणि लहान व्यावसायिक वाहनाशी कोणाचा तरी उदरनिर्वाह बांधलेला असतो — मग तो एखादा चालक, दुकानदार, डिलिव्हरी पार्टनर किंवा लघु-व्यावसायिक असो. आज, अशा 4 लाखांहून अधिक प्रवासांची पूर्तता महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक वाहनांद्वारे केली जात आहे. देशाची वाटचाल यशस्वीरित्या इलेक्ट्रिक लास्ट माईल मोबिलिटीकडे करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, एकूण 4 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करणारी महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेड ही भारतातील पहिली व्यावसायिक ईव्ही (EV) उत्पादक कंपनी ठरली आहे.
हा टप्पा गाठणे म्हणजे अशा लाखो ग्राहकांचा विश्वास आहे, जे आपली उपजीविका, व्यवसायवृद्धी आणि प्रगतीसाठी महिंद्राच्या इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांवर अवलंबून आहेत. एमएलएमएमएलच्या यशामागे एक साधी धारणा आहे: जेव्हा इलेक्ट्रिक मोबिलिटी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते, तेव्हाच ग्राहक तिचा स्वीकार करतात. पर्यावरणाशी संबंधित उपाययोजना स्वीकारण्याचे आवाहन करण्याऐवजी, कंपनीने अशा उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले ज्यामुळे ग्राहकांचे दैनंदिन उत्पन्न आणि व्यावसायिक परिणाम सुधारले. आणि त्यामुळे याचे पर्यावरणासाठी होणारे फायदे आपोआपच साध्य झाले.
महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहनांनी (ज्यामध्ये UDO, Treo श्रेणी, Zor Grand, ZEO आणि e-Alfa यांचा समावेश आहे) एकत्रितपणे 9 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले आहे आणि सुमारे 1,85,000 मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन टाळण्यास मदत केली आहे. जे 83 लाखांहून अधिक झाडे लावण्याइतके प्रभावी आहे.
ग्राहक-केंद्रित उत्पादने, भागीदारी, वित्तपुरवठा आणि ग्राहक सेवा यातील गुंतवणुकीच्या बळावर, एमएलएमएमएल ही कंपनी 2031 पर्यंत रस्त्यांवर दहा लाख (एक दशलक्ष) ईव्ही (EVs) आणण्याच्या दिशेने काम करते आहे.
महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, सुश्री सुमन मिश्रा म्हणाल्या, 4 लाख हा आमच्यासाठी केवळ एक आकडा नाही, तर उदरनिर्वाहाचे साधन बनलेल्या 4 लाख लोकांचे जीवनमान आहे. हा टप्पा त्या चालकांचा आणि उद्योजकांचा आहे ज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निवड केली; तसेच त्या भागीदारांचा आणि टीम्सचा आहे ज्यांनी भारताच्या लास्ट माईल अर्थव्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी हा एक व्यावहारिक पर्याय ठरवला. आमचे ध्येय स्पष्ट आहे: उत्तम उत्पादने तयार करणे, परिसंस्था (इकोसिस्टम) बळकट करणे आणि प्रत्येक लास्ट माईल ग्राहकासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी सुलभ करणे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर