ई-कॉमर्स व्यवसायात ३ वर्षांत १४ पट वाढ; इंटेरिओकडून तंत्रज्ञानावर आधारिक फर्निचर खरेदीचा विस्तार
मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रयझेस ग्रुपच्या इंटेरिओ बाय गोदरेज या आघाडीच्या फर्निचर ब्रँडने ग्राहकांच्या खरेदी अनुभवात मोठा बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ग्राहकांची पसंती, डिजीटल तंत्रज्ञान आणि दुकानांमधील प्रत्यक्ष विक्री
ई-कॉमर्स व्यवसायात ३ वर्षांत १४ पट वाढ; इंटेरिओकडून तंत्रज्ञानावर आधारिक फर्निचर खरेदीचा विस्तार


मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रयझेस ग्रुपच्या इंटेरिओ बाय गोदरेज या आघाडीच्या फर्निचर ब्रँडने ग्राहकांच्या खरेदी अनुभवात मोठा बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ग्राहकांची पसंती, डिजीटल तंत्रज्ञान आणि दुकानांमधील प्रत्यक्ष विक्री यांची उत्तम सांगड घातली आहे. खरेदीच्या प्रक्रियेत एआय शिफारसी, ३डी तंत्रज्ञान, खोलीचे नियोजन आणि आवडीनुसार फर्निचर निवडीचे पर्याय उपलब्ध केले आहेत. या आधुनिक डिजिटल उपलब्धतेमुळे ग्राहकांच्या खरेदी रुपांतरण दरात ६ टक्क्यांनी सुधारणा झाल्याची माहिती गोदरेज एंटरप्रायझेसच्यावतीने दिली गेली.

गेल्या तीन वर्षांत इंटेरिओच्या ई-कॉमर्स व्यवसायात तब्बल १४ पटींनी वाढ झाली आहे. यात फर्निचर व्यवसायातील वाटा १५ टक्क्यांनी वाढला आहे. ब्रँण्डने आपल्या डिलिव्हरी व इस्टॉलेशन सेवेचा विस्तार १,२०० वरुन आता २०,०००हून अधिक पिनकोडपर्यंत केला आहे. यासोबतच सर्व राज्यांची राजधानी असलेल्या शहरांमध्ये डिलीव्हरी आणि इस्टॉलेशनची सुविधा २४ तासांच्या आत उपलब्ध करुन दिली जाईल.पुनब्रँण्डिंगनंतर कंपनीने पारंपरिक उत्पादन विक्री पद्धतीऐवजी ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे मॉडेल स्विकारले आहे. याद्वारे प्रत्यक्ष दुकाने, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डिझाइन सल्लागार यांची उत्तम सांगड घातली जात आहे. हे तंत्रज्ञान आधारित मॉडेल २० शहरांमधील १३७ दुकानांमध्ये यशस्वीरित्या लागू करण्यात आले आहे.

या नव्या उपक्रमाबाबत बोलताना इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसाय प्रमुख डॉ. देव नारायण सरकार म्हणाले, “आजकाल अनेकजण फर्निचर खरेदी करण्यापूर्वी आपल्या घरातील जागेता वापर कसा करायचा, याचा विचार अगोदर करतात. मोठ्या शहरांसोबतच इतर शहरांमध्येही आता राहणीमान आणि खरेदीच्या सवयी बदलू लागल्या आहेत. एकापेक्षा अनेक कामांसाठी वापरता येईल, गरजेनुसार बदलता येईल, असे फर्निचर लोकांकडून निवडले जाते. म्हणूनच आम्ही केवळ फर्निचर विक्रीपुरती मर्यादित न राहता तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यावर भर देत आहोत. डिजिटल डिझाइन, तज्ज्ञांच्या सल्ला आणि आवडीनुसार फर्निचर निवडीच्या सुविधेमुळे इंटेरिओ ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य खरेदी करण्यास मदत करत आहे.”

हा आधुनिक बदल केवळ ग्राहकांच्या अनुभवापुरता मर्यादित नसून, कंपनीच्या अंतर्गत कामातही मोठी सुधारणा घडवून आणत आहे. इंटेरिओ कंपनी आपले कामकाज सक्षम आणि वेगवान करण्यासाठी रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. यासोबतच पुरवठा साखळी आणि इतर सर्व डिजिटल यंत्रणांना एकत्र जोडले जात आहे. ग्राहकांच्या ऑनलाईन अनुभवाला प्रत्यक्ष सेवा देणा-या अंतर्गत प्रक्रियेशी जोडणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर दर्जेदार, सुलभ आणि विश्वासार्ह सेवा मिळणार मदत होणार आहे.

ग्राहक तसेच दुकानातील कर्मचा-यांना इंटेरिओचे ३डी रूम प्लॅनर आणि ३डी कॉन्फियुरेटर हे खास तंत्रज्ञान घरातील प्रत्यक्ष मापांनुसार खोल्यांची रचना करण्यास मदत करते. खरेदी करण्यापूर्वी फर्निचर २डी आणि ३डी रुपात कसे दिसेल, हे पाहण्याची सोय यात उपलब्ध आहे. यामुळे ग्राहक विविध पर्यायांची पडताळणी करू शकतात. यासोबतच मेजर एण्ड रेकमेंट सुविधाही उपलब्ध जागेनुसार योग्य फर्निचर सुचवते. त्यामुळे ग्राहकांना आपल्या घराच्या गरजेनुसार योग्य फर्निचर निवडणे सोपे होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande