चारधाम यात्रेत 48 लाखांहून अधिक भाविक दाखल; यमुनोत्रीत नवा विक्रम
देहरादून, 22 ऑगस्ट (हिं.स.)। उत्तराखंडमध्ये मान्सूनच्या आव्हानात्मक परिस्थिती असूनही चारधाम यात्रा सुरू आहे. यात्रेच्या 125 दिवसांत 48 लाखांहून अधिक भाविकांनी चारधामांचे दर्शन घेतले आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 5 लाख 22 हज
Char Dham Yatra Record


देहरादून, 22 ऑगस्ट (हिं.स.)। उत्तराखंडमध्ये मान्सूनच्या आव्हानात्मक परिस्थिती असूनही चारधाम यात्रा सुरू आहे. यात्रेच्या 125 दिवसांत 48 लाखांहून अधिक भाविकांनी चारधामांचे दर्शन घेतले आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 5 लाख 22 हजार 634 ने अधिक आहे. दरम्यान, यमुनोत्री धाममध्ये भाविकांच्या संख्येने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रथमच येथे 6.68 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, चारधाम यात्रेकरूंची सुरक्षा ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. चारही धाम आणि यात्रा मार्गावरील थांब्यांवर भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही यात्रा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकारनुसार, मान्सूनचा विचार करता चारधाम यात्रा विशेष दक्षता आणि देखरेखीखाली चालवली जात आहे. यात्रेशी संबंधित रुद्रप्रयाग, चमोली आणि उत्तरकाशी जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. हवामान खराब झाल्यास यात्रा नियंत्रित केली जात आहे आणि भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यक पावले उचलली जात आहेत.

यमुनोत्री धाममध्ये यावर्षी भाविकांच्या संख्येने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रथमच येथे 6 लाख 68 हजारांहून अधिक भाविक पोहोचले आहेत. शुक्रवारपर्यंत 6 लाख 68 हजार 163 भाविकांनी माता यमुनेचे दर्शन घेतले आहे. वर्ष 2025 मध्ये ही संख्या 6 लाख 44 हजार 637 होती. यावर्षी 19 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे कपाट उघडल्यानंतर चारधाम यात्रा सुरू झाली होती. 21 ऑगस्टपर्यंत बद्रीनाथमध्ये 16 लाख 54 हजार 263, केदारनाथमध्ये 14 लाख 65 हजार 370, गंगोत्रीमध्ये 7 लाख 47 हजार 671 आणि यमुनोत्रीमध्ये 6 लाख 68 हजार 163 भाविकांनी दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर हेमकुंड साहिबमध्ये 2 लाख 69 हजार 430 भाविकांनी माथा टेकवला आहे. बद्रीनाथ धाममध्येही भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी येथे 3 लाख 62 हजार 304 अधिक भाविक पोहोचले आहेत.

यमुनोत्री धाममध्ये दरवर्षी भाविकांची संख्या

2025------6,44,637

2024------5,15,067

2023------5,60,918

2022------6,21,538

2021--------33,311

2020---------7728

2019---------4,65,534

2018---------3,94,445

2017---------3,92,208

2016---------1,55,129

2015---------1,22,926

2014---------038,294

2013---------253110

2012---------413615

2011---------448945

2010---------309634

2009--------322242

2008--------327611

2007--------287870

2006--------216883

2005--------169046

2004--------102331

2003--------78,050

2002--------54023

2001--------54074

2000-------88672

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande