
लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसाच्या जेमतेम ओलीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग, उडीद व तुर पिकांची पेरणी केली. उपलब्ध ओलीवर पिक जोमदार उगवले माञ पेरणी केल्यापासुन मोठा पाऊस पडत नसल्यामुळे जमीणीतील ओल कमी होऊ नये म्हणुन शेतकरी कोळपणी करण्यास सुरवात केली आहेत.
येरोळ व परिसरात यावर्षी पावसाळा निम्मा सरला तरी मोठा पाऊस पडला नसल्यामुळे नदी नाल्या वाहिल्या नाहीत परिणामी विहीर बोअर पांढरवाडी लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. काही शेतकरी उपलब्ध पाणी स्प्रिंक्लरद्वारे पिकाला पाणी देवुन जगविण्याचा पर्यत्न करत आहेत. माञ कोरडवाहु शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमीणीतील पिके दुपार धरत असुन आठ दिवसात पाऊस नाही पडल्यास संपुर्ण पिके करपुन जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी केलेला खर्च वाया जातो की काय हाच प्रश्न शेतकऱ्यांना झोप येवु देत नाही.
शासनाने नुकसान भरपाई द्यावी...
पावसाळा सुरु होऊन तीन महिण्याचा कालावधी झाला परंतु एकही मोठा पाऊस पडला नाही. परीणामी पाऊस न पडल्याने विहीर बोअर तलावातील पाणी पातळी घटली आहे. हलक्या रानावरील पिके करपुन जात आहेत. शेतीसाठी घातलेला खर्चही निघणार नसुन जणावरांचा चारा संपत आला आहे.
शासनाने कोरडा दुस्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावेत जनावरांना चारा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी गुंडेराव चौसष्टे, नागनाथ पाटील कासार, विश्वनाथ साकोळकर, बब्बण साकोळकर, सुनिल बरदाळे, प्रकाश बनसोडे, हावगी दाडगे, विक्रम साकोळकर, वैजीनाथ दाडगे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis