धाराशिव : दुग्ध व्यवसाय व शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
धाराशिव, 21 ऑगस्ट (हिं.स.)। पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद धाराशिव आणि पंचायत समिती, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुग्ध व्यवसाय व शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थी, पशुपालक तस
अ


धाराशिव, 21 ऑगस्ट (हिं.स.)। पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद धाराशिव आणि पंचायत समिती, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुग्ध व्यवसाय व शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थी, पशुपालक तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. प्रशिक्षणाच्या माध्यमातून पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, पशुधन व्यवस्थापन, रोगप्रतिबंधक उपाययोजना, दूध उत्पादन वाढविण्याच्या प्रभावी पद्धती तसेच शेळीपालनातील विविध व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील युवकांनी पशुपालनाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता स्वयंरोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि उत्पन्नवाढीचे प्रभावी साधन म्हणून पाहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आधुनिक पद्धतींचा अवलंब करून दुग्ध व्यवसाय व शेळीपालन अधिक व्यावसायिक पद्धतीने केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास पशुसंवर्धन व कृषी सभापती, जि.प. धाराशिव भाऊसाहेब खडसरे, पंचायत समिती भूमच्या सभापती पूजा विशाल ढगे, उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, धाराशिव दीपक मुळे यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, पशुपालक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande