लातूर जिल्हाधिकाऱ्यांनीही पूर्ण केली तीन किलोमीटरची वॉकेथॉन
लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। लातूरमधील युवक-युवती, खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटांतील नागरिकांनी या महा वॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मृद व जलसंधारणासाठी राज्य शासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद दिला. सहभागींनी सुमारे तीन किलोम
जिल्हाधिकारी


लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

लातूरमधील युवक-युवती, खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटांतील नागरिकांनी या महा वॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मृद व जलसंधारणासाठी राज्य शासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद दिला. सहभागींनी सुमारे तीन किलोमीटर पायी चालत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश दिला. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनीही स्वतः सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे तीन किलोमीटरचे अंतर चालत पार केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande