ल्यूमिनो इंडस्ट्रीजचा आयपीओ २७ ऑगस्टला होणार खुला
मुंबई, 21 ऑगस्ट (हिं.स.)। कंडक्टर आणि वीज केबल उत्पादक ल्यूमिनो इंडस्ट्रीज लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) गुंतवणूकदारांसाठी २७ ऑगस्टला खुला होणार आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार ३१ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतात. अँकर गुंतवण
Lumino Industries IPO open August 27 price band Rs


मुंबई, 21 ऑगस्ट (हिं.स.)। कंडक्टर आणि वीज केबल उत्पादक ल्यूमिनो इंडस्ट्रीज लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) गुंतवणूकदारांसाठी २७ ऑगस्टला खुला होणार आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार ३१ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतात. अँकर गुंतवणूकदार २५ ऑगस्टला बोली लावू शकतील. कंपनीने यासाठी किंमत श्रेणी (प्राइस बँड) ७८-८२ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

ल्यूमिनो इंडस्ट्रीज लिमिटेडची या इश्यूच्या माध्यमातून ७०० कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. कंपनीने सांगितले की, हा आयपीओ ५०० कोटी रुपयांच्या नवीन शेअर्स आणि सुमारे २०० कोटी रुपयांच्या शेअर्सच्या विक्री प्रस्तावाचा (ओएफएस) समावेश असलेला आहे. कंपनी नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या निधीचा वापर कर्ज फेडण्यासाठी, उपकरणे आणि मशिनरी खरेदी करण्यासाठी तसेच कंपनीच्या सामान्य कामकाजासाठी करणार आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या इश्यूमध्ये गुंतवणूकदार किमान १८२ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १८२ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. कंपनीचे शेअर्स ३ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनी भारतातील एक प्रॉडक्ट-बेस्ड इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (ईपीसी) कंपनी आहे. देशातील वाढत्या पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन क्षेत्रासाठी कंडक्टर, पॉवर केबल, इलेक्ट्रिकल वायर आणि इतर विशेष प्रॉडक्ट्स व कंपोनंट्स तयार करणे आणि त्यांचा पुरवठा करणे यावर कंपनीचा मुख्य भर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande