छ. संभाजीनगर - जलसंधारण दिनानिमित्त महावॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिनानिमित्त आज महावॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या दरम्यान झालेल्या या जनजागृती पदयात्र
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिनानिमित्त आज महावॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या दरम्यान झालेल्या या जनजागृती पदयात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

यावर्षी या उपक्रमाला सुरुवात झाली आहे त्या निमत्ताने मोठी पदयात्रा काढण्यात आली

‘माती आणि पाण्या’साठी हजारोंची पावले; महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आयोजित ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या मार्गावर नागरिकांनी पदयात्रेत सहभाग घेतला. प्रारंभी माती व पाणी संवर्धनाची शपथ घेण्यात आली. पैठण गेट, गुलमंडीमार्गे जिल्हा परिषद मैदानावर पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. आमदार सुहास शिरसाट, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अधिकारी, महिला-पुरुष आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपतीसंभाजीनगर येथे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिनानिमित्त आज महावॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळा या दरम्यान झालेल्या या जनजागृती पदयात्रेत छत्रपती संभाजीीीनगर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande