छ. संभाजीनगर - राष्ट्रीय क्रीडा दिनी गुणवंत खेळाडूंचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा २९ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच २८ ते ३० ऑगस्टदरम
छ. संभाजीनगर - राष्ट्रीय क्रीडा दिनी गुणवंत खेळाडूंचा सत्कार


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा २९ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तसेच २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा मक्ता येथे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांनी कळवले आहे.

जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडूंनी त्यांच्या प्रमाणपत्रांची छायांकित प्रत २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करावी.

या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी तसेच सत्कारासाठी पात्र खेळाडूंनी २५ ऑगस्टपर्यंत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande