प्रकल्पांना गती, विकासकामांना दिशा - महापौर राजूरकर
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर यांनी शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. वसंत भवन लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, यासाठी आवश्यक कार्यवाहीला गती देण
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर यांनी

शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.

वसंत भवन लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, यासाठी आवश्यक कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, वर्किंग वुमन हॉस्टेल, दिव्यांग भवन, एन-८ रुग्णालय, मेल्ट्रॉन हॉस्पिटल, नवीन अग्निशमन केंद्रे, जाधववाडी बस डेपो, सी अँड डी वेस्ट युनिट, गरवारे स्टेडियमसह विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

प्रत्येक प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा आणि त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळावा, हाच या आढावा बैठकीचा मुख्य उद्देश आहे.

महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रलंबित बाबींचा नियमित पाठपुरावा करावा, अशा स्पष्ट सूचना यावेळी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande