
नांदेड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचा जयंती दिवस देशपातळीवर राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणुन पाळला जातो. त्याअनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके तर्फे मुख्य प्रशासकीय इमारत, स्थायी समिती सभागृह येथे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेची शपथ घेतली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त नितीन गाढवे,उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त गंगाधर ईरलोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, मुख्य लेखा परीक्षक आनंद ऐनवाड, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis