
नागपूर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : भारतातील प्रवास आणि दळणवळण क्षेत्रातील नव्या पिढीतील भारतीय ब्रँड युमीने नागपुरात आपले पहिले स्टोअर सुरू केले आहे. उत्कृष्ट डिझाइन, कार्यक्षम वापर आणि प्रीमिअम अनुभव यांचा वाजवी किमतीत संगम साधणाऱ्या ‘ब्रीज टू लक्झ्युरी’ या संकल्पनेद्वारे कंपनीने नागपूरच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. राष्ट्रीय पातळीवर आपली रिटेल ओळख मजबूत करण्याच्या युमीच्या विस्तार धोरणातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
युमीच्या रिटेल विभागाचे प्रमुख मानवी पारेख यांनी सांगितले की, नागपूर हा कंपनीच्या रिटेल विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे. नव्या युगातील भारतीय ट्रॅव्हल ब्रँड म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून, ‘ब्रीज टू लक्झ्युरी’च्या माध्यमातून उत्कृष्ट डिझाइन, उपयुक्तता आणि प्रीमिअम अनुभव ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. नागपूरमधील वाढता महत्त्वाकांक्षी आणि चोखंदळ ग्राहकवर्ग युमीसाठी महत्त्वाची बाजारपेठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूरमध्ये प्रवेश करताना युमीने डिजिटलस्नेही, वारंवार प्रवास करणाऱ्या आणि दर्जेदार उत्पादनांना पसंती देणाऱ्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवले आहे. ब्रँडच्या ‘ब्रीज टू लक्झ्युरी’ तत्त्वज्ञानाचा उद्देश प्रीमिअम उत्पादनांचा अनुभव सर्वसामान्य ग्राहकांसाठी अधिक सुलभ करणे हा आहे. आकर्षक डिझाइनसोबत टिकाऊपणा, कार्यक्षमता आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांवर कंपनीचा भर आहे.
नव्या हाय-स्ट्रीट स्टोअरमध्ये ग्राहकांना उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. विविध आकार, मटेरिअल, स्टोरेज पर्याय आणि डिझाइन वैशिष्ट्यांची पाहणी करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. केबिन व चेक-इन लगेज, बॅकपॅक्स, ट्रॅव्हल बॅग्स, मेसेंजर बॅग्स, स्लिंग्स तसेच विविध ट्रॅव्हल अॅक्सेसरीजचा समावेश उत्पादन श्रेणीत आहे. दैनंदिन प्रवासापासून व्यावसायिक दौरे, विकेंड ट्रिप आणि आंतरराष्ट्रीय सहलींपर्यंत विविध गरजांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
युमीच्या नागपूर प्रवेशातून प्रीमिअमनायझेशनचा कल मोठ्या शहरांच्या पलीकडेही विस्तारत असल्याचे दिसून येते. विकसित होत असलेल्या शहरांमधील ग्राहकही आता सौंदर्य, टिकाऊपणा, कार्यक्षमता आणि नाविन्य यांचा समतोल साधणाऱ्या उत्पादनांना पसंती देत आहेत. त्यामुळे युमीच्या ‘ब्रीज टू लक्झ्युरी’ संकल्पनेला अशा बाजारपेठांमध्ये मोठी संधी असल्याचे कंपनीचे मत आहे.
नागपूरमधील स्टोअर हे युमीच्या व्यापक मल्टिचॅनेल रिटेल धोरणाचा एक भाग आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मसोबत ऑफलाइन स्टोअरच्या माध्यमातून ग्राहकांना उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यावर कंपनी भर देत आहे. भारतातील नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करताना प्रीमिअम ट्रॅव्हल डिझाइन अधिक सुलभ आणि व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट युमीने ठेवले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis