
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)।
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय कलामंच, बीड आयोजित तसेच सौ. के.एस.के. महाविद्यालय, संगीत विभाग प्रस्तुत ‘वंदे मातरम्’ देशभक्तीपर गीत व कविता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थित राहून सहभागी कलाकार, विद्यार्थी व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सुंदर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी अभाविप शहराध्यक्ष प्रा. जगन्नाथ चव्हाण, अभाविप देवगिरी प्रांत संघटन मंत्री सिद्धेश्वर लटपटे, प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, प्रा. संजय पाटील देवळाणकर, प्रा. अनिता शिंदे यांच्यासह विद्यार्थी व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis