राजश्री बाहेती भाजपा ओबीसी युवती प्रदेश प्रमुख
लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या युवती प्रदेश प्रमुखपदी लातूरच्या नगरसेविका राजश्री अंकीत बाहेती (धोत्रे) यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी
राजश्री बाहेती


लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या युवती प्रदेश प्रमुखपदी लातूरच्या नगरसेविका राजश्री अंकीत बाहेती (धोत्रे) यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारीही आहे. ओबीसी समाजातील युवतींचे सक्षमीकरण, त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे आणि संघटन अधिक मजबूत करणेसाठी मी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करेन, पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सर्वांच्या सहकार्याने संघटनेच्या विस्तारासाठी आणि समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही देवून राजश्री धोत्रे यांनी पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. भाजपा ओबीसी मोर्चा युवती प्रदेश प्रमुख पदी राजश्री धोत्रे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त समजताच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande