
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जलसंधारण दिन व ‘महा वॉकेथॉन – Walk for Water’ हा उपक्रम संपन्न झाला.
‘माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा’ या संदेशातून जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याबाबत जनजागृती करणे आणि भविष्यातील पाणी सुरक्षिततेसाठी लोकसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
केज विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठान, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महा वॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.अशी भावना यानिमित्ताने व्यक्त केली गेली.
याप्रसंगी अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis