दिवसा सिंचनाला सौरऊर्जेची साथ; लातूर जिल्ह्यात ८२ प्रकल्प कार्यान्वित
लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। ४११ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती; १ लाख २ हजार ७५० शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ला लातूर
सौर ऊर्जा प्रकल्प


लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

४११ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती; १ लाख २ हजार ७५० शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ला लातूर जिल्ह्यात चांगले फलित मिळाले आहे. डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत जिल्ह्यात ४११ मेगावॅट क्षमतेचे ८२ सौरऊर्जा प्रकल्प

कार्यान्वित झाले असून, त्याचा लाभ१ लाख २ हजार ७५० शेतकऱ्यांना होत आहे.

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. महावितरणच्या उपकेंद्राच्या पाच किलोमीटर परिसरातील जमिनीवर सौर प्रकल्प उभारून त्यातून निर्माण होणारी वीज कृषी फिडरद्वारे शेतकऱ्यांना दिवसा उपलब्ध करून दिली जात आहे. लातूर विभागात ३६ प्रकल्प पूर्ण झाले असून १८७ मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पांमुळे ४६ हजार ७५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. उदगीर विभागातील २२ प्रकल्पांमधून ११२ मेगावॅट वीज

निर्मिती होत असून २८ हजार शेतकरी लाभार्थी आहेत. तर निलंगा विभागातील २४ प्रकल्पांमधून ११२ मेगावॅट क्षमतेची निर्मिती होत असून आणखी २८ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. यापूर्वी कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दिवस किंवा रात्री बीज दिली जात होती. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन सिंचन

करण्याची गैरसोय लक्षात घेऊन सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठ्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे सिंचनाचे नियोजन सुलभ होण्यासोबतच शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि रात्रीच्या शेतीकामातील गैरसोय कमी होत आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासही या योजनेची मदत होत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande