राजापुरात रविवारी जलतरण स्पर्धा
रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । राजापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि समर्थ नगर जलतरण क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शतकपूर्ती महोत्सवानिमित्त गुरुवर्य कै. आनंद भावे यांच्या स्मरणार्थ येत्या रविवारी, २३ ऑगस्ट रोजी राजापूरमध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन क
राजापुरात रविवारी जलतरण स्पर्धा


रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । राजापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि समर्थ नगर जलतरण क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शतकपूर्ती महोत्सवानिमित्त गुरुवर्य कै. आनंद भावे यांच्या स्मरणार्थ येत्या रविवारी, २३ ऑगस्ट रोजी राजापूरमध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ नगर येथील मारुती मंदिर तळी येथे ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेत १२, १४, १६ व १८ वर्षांखालील तसेच खुल्या गटातील मुले व मुलींना सहभागी होता येईल. प्रत्येक वयोगटासाठी ५० मीटर व १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात स्पर्धा घेतली जाणार आहे. स्थानिक जलतरणपटूंना प्रोत्साहन देणे तसेच नवोदित खेळाडूंना स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धकांनी रविवारी सकाळी ८ वाजता स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात येणार असून, सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पावसाअभावी मारुती मंदिर तळीतील पाण्याची पातळी कमी राहिल्यास स्पर्धेच्या नियोजनात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रतिस्पर्धक ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जलतरणपटूंनी शनिवारी, २२ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी अभय भावे (७५५९४८६६९९), उदय खडपे (७२१८१२०४२३), दीपक कोदलकर (७७६७८२३६७९) आणि महेश मयेकर (९४२२४२५७४०) यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande