
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट (हिं.स.)। मारुती, ह्युंदाईनंतर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (टीएमपीव्ही) ने आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. वाहन उत्पादक कंपनी टीएमपीव्ही आपल्या सर्व पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किमतींमध्ये 25 हजार रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. नवीन किमती 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होतील.
कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले की, टीएमपीव्ही 1 सप्टेंबरपासून आपल्या सर्व वाहनांच्या किमतींमध्ये 25 हजार रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. कंपनीने यामागे वाढता खर्च आणि महागाईचा दबाव हे कारण सांगितले आहे. ही वाढ सर्व श्रेणीतील अंतर्गत ज्वलन इंजिन (आयसीई) आणि ईव्हीच्या किमतींमध्ये मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असेल. टाटा मोटर्स लिमिटेडने म्हटले, ‘‘वाढता खर्च आणि महागाईच्या परिणामांचा अंशतः समतोल साधण्यासाठी किमतींमध्ये हा बदल करण्यात येत आहे.’’ ही वाढ विविध मॉडेल्स आणि व्हेरिएंट्सच्या आधारावर वेगवेगळी असेल. टीएमपीव्ही अजूनही या वाढीचा मोठा हिस्सा स्वतः वहन करत आहे, मात्र या सुधारित किमतींद्वारे त्याचा काही भार ग्राहकांवर टाकला जात आहे. उल्लेखनीय आहे की, टीएमपीव्हीच्या वाहन विभागात छोटी कार टियागोपासून प्रीमियम एसयूव्ही सफारी तसेच हॅरियर ईव्हीचा प्रामुख्याने समावेश आहे. या वाहनांची किंमत सुमारे 4.7 लाख रुपयांपासून 31 लाख रुपयांपर्यंत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule