छ. संभाजीनगर - गोरबा नगर परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। वैशिष्ट्यपूर्ण योजना २०२५-२६ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग (प), छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्याने कन्नड शहरातील प्रभाग क्र. ४ मधील गोरबा नगर परिसरातील वि
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। वैशिष्ट्यपूर्ण योजना २०२५-२६ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग (प), छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्याने कन्नड शहरातील प्रभाग क्र. ४ मधील गोरबा नगर परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.

यामध्ये गोरबा मंदिर येथून देविदास मोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व क्लोज्ड ड्रेन बांधकामासाठी ४० लाख रुपये, तसेच गोरबा मंदिर परिसरात सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपये अशा एकूण ६० लाख रुपयांचा कामाचा समावेश आहे.

या विकासकामांमुळे गोरबा नगर परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचा रस्ता, योग्य जलनिस्सारण व्यवस्था तसेच सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभागृहाची सुविधा उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत कन्नड शहराच्या विकासाची ही वाटचाल अशीच अखंड सुरू राहील.असे आमदार संजना जाधव यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande