
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथील लक्ष्मीनारायण हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.
२० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११.४८ वाजता ही कारवाई करण्यात आली. शुभम भरत वाघमारे (वय १९, रा. नकलगाव, ता. माजलगाव) याच्याकडून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात तरुणांकडे गावठी कट्टे पोहोचत असल्याने हे शस्त्र नेमके कोण पुरवते आणि यामागे पुरवठ्याचे रॅकेट आहे का, याचा तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis