चिखलदऱ्याच्या सक्कर तलावात अखेर वॉटर बोटिंग सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यच्या प्रसिद्ध सक्कर तलावामध्ये अखेर वॉटर बोटिंग सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तलावाची पाणीपातळी कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वॉटर बोटिंग बंद ठेवण्यात आले होत
चिखलदऱ्याच्या सक्कर तलावात अखेर वॉटर बोटिंग सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण


अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यच्या प्रसिद्ध सक्कर तलावामध्ये अखेर वॉटर बोटिंग सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तलावाची पाणीपातळी कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वॉटर बोटिंग बंद ठेवण्यात आले होते. मात्र, चिखलदऱ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तलावाची पाणीपातळी वाढली असून वॉटर बोटिंगला पुन्हा सुरुवात झाली आहे.

चिखलदऱ्यात सध्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच सक्कर तलावातील वॉटर बोटिंग पुन्हा सुरू झाल्याने पर्यटकांच्या आनंदात आणखी भर पडली आहे.पावसाअभावी सक्कर तलावाची पाणीपातळी कमी झाली होती. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वॉटर बोटिंग सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. मागील काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे तलावाची पाणीपातळी वाढली आणि बोटिंगसाठी परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर प्रशासनाकडून वॉटर बोटिंगला हिरवा कंदील देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande