छ. संभाजीनगर - बालाजी मंदिर परिसरात सभागृह बांधकामाच्या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण योजना अंतर्गत सन २०२५-२६ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग (प), छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्याने कन्नड शहरातील
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण योजना अंतर्गत सन २०२५-२६ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग (प), छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्याने कन्नड शहरातील प्रभाग क्र. ८ मधील २० लक्ष रुपयांच्या निधीतून बालाजी मंदिर परिसरात सभागृह बांधकामाच्या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या माध्यमातून बालाजी मंदिर परिसरात सुसज्ज सभागृहाची निर्मिती करण्यात येणार असून, भविष्यात परिसरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी एक उपयुक्त व प्रशस्त सुविधा उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी नहराध्यक्षा शेख फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ, नगरसेविका शितलताई संदीप घोंगते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande