राज्यातील धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा
पुणे, 21 ऑगस्ट (हिं.स.)।राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला असला, तरी विविध विभागांमधील साठ्यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्व धरणांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ३८,०७७.६० दशलक्ष घनमीटर, म्हणजेच सुमारे ७४ टक्के
dam


पुणे, 21 ऑगस्ट (हिं.स.)।राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला असला, तरी विविध विभागांमधील साठ्यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्व धरणांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ३८,०७७.६० दशलक्ष घनमीटर, म्हणजेच सुमारे ७४ टक्के झाला आहे. मात्र, गतवर्षी याच कालावधीत हा साठा ७९.०८ टक्के होता. त्यामुळे यंदाचा साठा गतवर्षीपेक्षा सुमारे पाच टक्क्यांनी कमी आहे.

पुणे विभागाने पाणीसाठ्याच्या बाबतीत चांगली स्थिती कायम ठेवली असून, विभागातील धरणांमध्ये ८७.९४ टक्के पाणीसाठा आहे. पुण्यापेक्षा अधिक साठा कोकण विभागात असून, तेथे धरणांमध्ये ८९.५३ टक्के पाणी आहे. नाशिक विभागात ७७.५३ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे.दुसरीकडे, राज्यातील काही भागांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. अमरावती विभागात ६१.९५ टक्के, नागपूर विभागात ५९.७९ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ ४९.८७ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील साठा ६९.०३ टक्के होता.राज्यातील ३६ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. इतर धरणांमध्ये ५ ते ९५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे. त्यामुळे राज्याची सरासरी स्थिती समाधानकारक असली, तरी विभागनिहाय मोठी असमानता दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande