पुणे रिंगरोडच्या मोजणीला शिवरेकरांचा विरोध; दोन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय
पुणे, 21 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे रिंगरोडसाठी जमीन मोजणीला भोर तालुक्यातील शिवरे गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला. पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत मोजणीची प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले.रिंगरोडसाठी स्
Ring Road Pune


पुणे, 21 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे रिंगरोडसाठी जमीन मोजणीला भोर तालुक्यातील शिवरे गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला. पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत मोजणीची प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले.रिंगरोडसाठी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमीन मोजणी सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे गुरुवारी मोजणीसाठी अधिकारी गावात दाखल झाल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. परिस्थिती लक्षात घेऊन घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून ठराव घेण्यात आला. महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पिकांची काढणी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्याचे मान्य केले.पिके शेतात उभी असताना जमीन मोजणी झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने मोजणी पुढे ढकलावी, अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे शिवरे गावातील रिंगरोडच्या मोजणीचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande