महावॉकेथॉनमध्ये रत्नागिरीत उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । जलसंधारण दिनानिमित्त रत्नागिरीत आज आयोजित करण्यात आलेल्या ''महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर'' उपक्रमात रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘पाण्याचा प्रत्येक थेंब जपू या, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवू या’, असा दृ
रत्नागिरीतील महावॉकेथॉन


रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । जलसंधारण दिनानिमित्त रत्नागिरीत आज आयोजित करण्यात आलेल्या 'महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर' उपक्रमात रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

‘पाण्याचा प्रत्येक थेंब जपू या, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवू या’, असा दृढ संकल्प याद्वारे करण्यात आला. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या तीन किलोमीटरच्या महावॉकेथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन जलजागृती केली.

ऐतिहासिक जयस्तंभ चौकात सामूहिक शपथ घेतल्यावर महावॉकेथॉन सुरू झाली. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, मृद् व जल संधारण कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर महावॉकेथॉनला प्रारंभ झाला.

जयस्तंभ चौक ते माळनाका आणि पुन्हा जयस्तंभ चौक असा पदयात्रेचा मार्ग होता. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande