'सुवर्ण मंदिर' आणि 'जालियनवाला बाग' येथे शूट करण्याचा अनुभव खूपच खास - शिवानी सोनार
मुंबई, 21 ऑगस्ट,(हिं.स.)। देशाच्या सुरक्षेसाठी ''तारिणी'' आपल्या भावना, वैयक्तिक आयुष्य आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवून एका गुप्त मोहिमेवर निघाली आहे. या मोहिमेसाठी ती अमृतसरला पोहोचते. एका गूढ संदेशापासून सुरू झालेला तिचा प्रवास तिला बीएसएफच्या वरि
शिवानी


मुंबई, 21 ऑगस्ट,(हिं.स.)। देशाच्या सुरक्षेसाठी 'तारिणी' आपल्या भावना, वैयक्तिक आयुष्य आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवून एका गुप्त मोहिमेवर निघाली आहे. या मोहिमेसाठी ती अमृतसरला पोहोचते. एका गूढ संदेशापासून सुरू झालेला तिचा प्रवास तिला बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जातो. तिथे भारताविरोधात रचल्या जात असलेल्या एका मोठ्या कटाची माहिती तिला मिळते. या कटात शत्रू देशातील काही महिलांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या कटाचा शोध घेण्यासाठी तारिणीला कोणालाही आपली खरी ओळख न सांगता काम करायचं आहे. अमृतसरमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे ती संशयित सलमापर्यंत पोहोचते. या मिशनमध्ये प्रत्येक पाऊल धोक्याचं असणार आहे.

‘तारिणी ’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने अमृतसरमधील शूटिंगचा अनुभव सांगताना म्हटलं, “तारिणीसाठी अमृतसरला शूट करायला जाणार आहे हे कळलं तेव्हापासूनच मी खूप उत्सुक होते. त्याचवेळी थोडी नर्व्हसही होते. शूट कसं होईल, परवानग्या मिळतील का आणि एवढं सगळं काम वेळेत पूर्ण करता येईल का, याची काळजी होती. पण तिथे गेल्यावर शूट खूप छान झालं. 'सुवर्ण मंदिर' आणि 'जालियनवाला बाग' यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणी शूट करण्याचा अनुभव खूप खास होता. तारिणीने मला आतापर्यंत खूप काही दिलं आहे. अमृतसर-अटारी ट्रेनमध्ये शूट करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूपच खास आणि अविस्मरणीय होता. एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी शूट करणं हीच मोठी गोष्ट आहे आणि मला आमच्या मालिकेसाठी अशा ठिकाणी शूट करण्याची संधी मिळणं, हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तारिणीच्या व्यक्तिरेखेत राहून या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर काम करताना मला खूप वेगळा अनुभव मिळाला. या संपूर्ण शूटदरम्यान तारिणीचा प्रवास आणखी जवळून अनुभवता आला. माझ्यासाठी ही केवळ शूटिंगची संधी नव्हती, तर आयुष्यभर जपून ठेवावा असा अनुभव होता. हा अनुभव शक्य करून दिल्याबद्दल मी झी मराठी, निर्माते, दिग्दर्शक, प्रेक्षक आणि ‘तारिणी’च्या संपूर्ण टीमची मनापासून आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा खास आणि ऐतिहासिक ठिकाणी काम करता आलं. ‘तारिणी’ने मला आजवर अनेक सुंदर अनुभव दिले आहेत . या ठिकाणांचं वातावरण, तिथला इतिहास आणि तिथे काम करताना जाणवणारी ऊर्जा हे सगळं मनात कायम राहणार आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande