तापसी पन्नूच्या ‘गांधारी’चा दमदार अंदाज; रिलीज डेटही जाहीर
मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ''गांधारी''द्वारे पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. देवाशिष मखिजा दिग्दर्शित आणि कनिका धिल्लन लिखित हा थ्रिलर चित्रपट जबरदस्त ॲक्शन, गुन्हेगारी आणि सूडाच्या कथे
Gandhari


मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गांधारी'द्वारे पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. देवाशिष मखिजा दिग्दर्शित आणि कनिका धिल्लन लिखित हा थ्रिलर चित्रपट जबरदस्त ॲक्शन, गुन्हेगारी आणि सूडाच्या कथेवर आधारित आहे. कनिका धिल्लन यांच्या 'कथा पिक्चर्स' (Kathha Pictures) या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट चित्रपटगृहांऐवजी थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. याचे प्रीमियर ३ सप्टेंबर २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे.

'गांधारी'मध्ये तापसी पन्नू एका अशा आईची भूमिका साकारत आहे, जी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असते. या चित्रपटाची कथा आई आणि मुलींमधील घट्ट व अतूट नाते, तसेच सूड आणि संघर्षाचा भावनिक प्रवास उलगडून दाखवते. या चित्रपटातील तापसीची भूमिका तिच्या आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि अधिक आव्हानात्मक असल्याचे सांगितले जात आहे; यात ती दमदार ॲक्शन दृश्ये करतानाही दिसणार आहे.

चित्रपटाच्या कलाकारांच्या फळीत तापसीसोबत इश्वक सिंग, स्वस्तिका मुखर्जी, छाया कदम, जतिन सरना आणि मीता वशिष्ठ यांचा समावेश आहे. दिग्दर्शक देवाशिष मखिजा हे त्यांच्या गंभीर आणि प्रभावी कथाकथनाच्या शैलीसाठी ओळखले जातात, तर कनिका धिल्लन यांचे लेखन आणि निर्मिती यामुळे या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तापसी या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'अस्सी' (Assi) मध्ये दिसली होती; आता 'गांधारी'द्वारे ती ॲक्शन आणि भावनांचा संगम असलेल्या एका नवीन अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande