बीड - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
बीड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार येथील शासकीय निवासी शाळा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियोजनबद्ध अभ्य
अ


बीड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार येथील शासकीय निवासी शाळा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियोजनबद्ध अभ्यास, नियमित दिनक्रम व योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व त्यांनी सांगितले. तसेच वारणी येथील संत भगवानबाबा मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या बांधकामाची पाहणी करून जानेवारी २०२७ पूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी असल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी सतर्क झाले आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande