खंडाळ्यात २८१ व्या फिरत्या नारळी सप्ताहानिमित्त भक्तिमय वातावरण
छत्रपती संभाजीनगर, २२ ऑगस्ट (हिं.स.) : शंकरस्वामी शिवूर संस्थानच्या २८१ व्या फिरत्या नारळी सप्ताहानिमित्त वैजापूर तालुक्यातील मौजे खंडाळा येथे भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक नेत
अ


छत्रपती संभाजीनगर, २२ ऑगस्ट (हिं.स.) : शंकरस्वामी शिवूर संस्थानच्या २८१ व्या फिरत्या नारळी सप्ताहानिमित्त वैजापूर तालुक्यातील मौजे खंडाळा येथे भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सप्ताहाच्या पवित्र स्थळी उपस्थित राहून भाविक भक्तांचे दर्शन घेतले.

यावेळी ह.भ.प. सारंगधर महाराज भोपळे यांचे आशीर्वाद घेण्यात आले. हरिनामाचा गजर, संतवाणी आणि आध्यात्मिक विचारांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. या धार्मिक सोहळ्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी आमदार सुहास सिरसाठ, डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह सुनील पैठणपगारे, दशरथ बनकर, सुरेश राऊत, संदीप ठोंबरे, कैलास पवार, धनंजय धोर्डे, विनोद राजपूत, प्रेम राजपूत आणि शैलेश पोंदे यांची उपस्थिती होती.

याशिवाय पंचक्रोशीतील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा हा पवित्र सोहळा सर्वांच्या जीवनात भक्ती, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande