आ. उमाताई खापरे यांची भाजपा महानगर, नांदेड कार्यालयास सदिच्छा भेट!
नांदेड, 22 ऑगस्ट (हिं.स.)। विधान परिषदेच्या सदस्या उमाताई खापरे यांनी भारतीय जनता पार्टी महानगर, नांदेड कार्यालयास सदिच्छा भेट दिली . नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे संघटन आणि भारतीय जनता पक्षाच्या कामकाजाचे त्यांनी अवलोकन केले. नांदेड जि
अ


नांदेड, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

विधान परिषदेच्या सदस्या उमाताई खापरे यांनी

भारतीय जनता पार्टी महानगर, नांदेड कार्यालयास सदिच्छा भेट दिली . नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे संघटन आणि भारतीय जनता पक्षाच्या कामकाजाचे त्यांनी अवलोकन केले. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण असल्याचे तनी सांगितले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या तथा भाजपा महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा आ. उमाताई खापरे यांनी भारतीय जनता पार्टी महानगर, नांदेड कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांचा सत्कार करून आगामी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पक्षसंघटना, महिला सशक्तीकरण आणि जनसेवेच्या विविध विषयांवर यावेळी स्नेहपूर्ण संवाद झाला.

याप्रसंगी नगरसेविका अॅड. शांभवी प्रवीण साले, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, माजी नगरसेवक तथा सरचिटणीस विजय येवनकर, अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री रिदा रशिद, महिला मोर्चाच्या महादेवी मठपती आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande