
नांदेड, २२ ऑगस्ट (हिं.स.) : लोहा तालुक्यातील सुनेगाव तलाव येथे तिसऱ्या भव्य राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना आपली क्रीडा प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले असून, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याच्या संधीची दारे खुली झाली आहेत. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कौशल्य सादर केले.
केरळमध्ये ‘ओणम’ सणानिमित्त पारंपरिक नौकाविहार स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेची क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या दिशेने या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
लोहा-कंधार मतदारसंघात सिंचन, भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांसोबतच राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला. ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून ग्रामीण महाराष्ट्रातील युवा खेळाडूंच्या स्वप्नांना पंख देणारा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, न.पा. गटनेते भास्कर पवार, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, भैरवनाथ नाईकवाडे, नांदेडचे क्रीडा अधिकारी दत्तात्रेय गडपल्लेवार, क्रीडा अधिकारी तथा लातूरचे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा टॉम जोसेफ,
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis