बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय वसतिगृहांची पाहणी
बीड, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार येथील शासकीय निवासी शाळा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियोजनबद्ध अभ्
जिल्हाधिकारी


बीड, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार येथील शासकीय निवासी शाळा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियोजनबद्ध अभ्यास, नियमित दिनक्रम व योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व त्यांनी सांगितले. तसेच वारणी येथील संत भगवानबाबा मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या बांधकामाची पाहणी करून जानेवारी २०२७ पूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande