
बीड, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। या आठवड्यात साखरेच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे 80 रुपये किलो प्रमाणे खुल्या बाजारात साखर विकली जात आहे. साखरेचे भाव वाढले त्यामुळे उसाला तरी असाल भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
साखरेचे भाव वाढल्याने शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) बीड जिल्हा चिटणीस भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी गतवर्षीच्या उसाला प्रतिटन १,५०० रुपये अंतिम बिल देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी माजलगावचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
गतवर्षी साखरेचे दर कमी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना केवळ २,७७५ रुपये प्रतिटन दर मिळाला होता. आता दर वाढल्यामुळे कारखानदारांना मोठा नफा होत आहे, त्यामुळे या वाढीव दराचा लाभ माजलगावसह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis