लातूरचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास कुकडे यांनी स्वीकारला पदभार
लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नवनियुक्त शिक्षणाधिकारीपदी विकास कुकडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यानिमित्त राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्यावतीने त्यांचे शाल, फेटा व
शिक्षणाधिकारी


लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)।

लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नवनियुक्त शिक्षणाधिकारीपदी विकास कुकडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यानिमित्त राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्यावतीने त्यांचे शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

परभणी येथून लातूर जिल्हा परिषदेच्या रिक्त प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी विकास कुकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे संस्थापक-सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तुळजाभवानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande