रिसॉर्टच्या बुकिंग रकमेत 51.75 लाखांचा अपहार; सेल्स मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल
रायगड, 22 ऑगस्ट (हिं.स.) : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये लग्न समारंभांच्या बुकिंगच्या रकमेत अपहार केल्याप्रकरणी सेल्स मॅनेजरविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 51 लाख 75 हज
रिसॉर्टच्या बुकिंगच्या नावाखाली 51.75 लाखांचा अपहार; सेल्स मॅनेजरविरुद्ध गुन्हा  नेरळ : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये लग्न समारंभाच्या बुकिंगच्या रकमेचा अपहार करून रिसॉर्टची फसवणूक केल्याप्रकरणी सेल्स मॅनेजरविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण 51 लाख 75 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा नाशिक येथील रहिवासी असून तो धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. रिसॉर्टमध्ये होणाऱ्या लग्न समारंभांच्या बुकिंगची रक्कम ग्राहकांकडून स्वीकारून ती रिसॉर्टच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.  मात्र, आरोपीने ग्राहकांना बुकिंगच्या रकमेत सवलत देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर काही ग्राहकांकडून बुकिंगची रक्कम रिसॉर्टच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या बँक खात्यात तसेच रोख स्वरूपात स्वीकारल्याचा आरोप आहे.  पोलिसांच्या नोंदीनुसार, एका ग्राहकाकडून 8 लाख रुपये रोख, दुसऱ्या ग्राहकाकडून 15 लाख रुपये, तिसऱ्या ग्राहकाकडून 15 लाख 50 हजार रुपये आणि चौथ्या ग्राहकाकडून 11 लाख 25 हजार रुपये बँक खात्यात, तसेच 2 लाख रुपये रोख असे पैसे घेण्यात आले. अशा प्रकारे एकूण 51 लाख 75 हजार रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.  या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 188/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 316(2) आणि 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी शेंबडे करीत आहेत. प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची तसेच संबंधित बँक खात्यांची चौकशी केली जात आहे.


रायगड, 22 ऑगस्ट (हिं.स.) : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये लग्न समारंभांच्या बुकिंगच्या रकमेत अपहार केल्याप्रकरणी सेल्स मॅनेजरविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 51 लाख 75 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी नाशिक येथील रहिवासी असून तो धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. रिसॉर्टमध्ये आयोजित होणाऱ्या लग्न समारंभांच्या बुकिंगची रक्कम ग्राहकांकडून स्वीकारून ती रिसॉर्टच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

मात्र, आरोपीने ग्राहकांना बुकिंगच्या रकमेत सवलत देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही ग्राहकांकडून बुकिंगची रक्कम रिसॉर्टच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या बँक खात्यात तसेच रोख स्वरूपात स्वीकारल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, एका ग्राहकाकडून 8 लाख रुपये रोख, दुसऱ्या ग्राहकाकडून 15 लाख रुपये, तिसऱ्या ग्राहकाकडून 15 लाख 50 हजार रुपये आणि चौथ्या ग्राहकाकडून 11 लाख 25 हजार रुपये बँक खात्यात तसेच 2 लाख रुपये रोख स्वीकारण्यात आले. अशा प्रकारे एकूण 51 लाख 75 हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 188/2026 नुसार भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 316(2) आणि 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी शेंबडे करीत आहेत.

दरम्यान, प्रकरणातील आर्थिक व्यवहार तसेच संबंधित बँक खात्यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असून, या तपासातून अपहाराच्या व्यवहारांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande